Jun 18, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 6

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 6

     (भाग 5)               (भाग 7) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning-6

 

501.Am I dreaming? (अॅम आय ड्रीमिंग?) - मी स्वप्न बघतोय का? मी स्वप्न बघतेय का?

502.Anything else ? (एनीथिंग एल्स?) - अजून काही ?

503.Are they dead? (आर दे डेड?) - ते मेले आहेत का?

504.Are you alone? (आर यू अलोन?) - तू एकटा आहेस का? तू एकटी आहेस का ?

505.Are you tired?  (आर यू टायर्ड?) - तू थकलास का? तू थकलीस का? तुम्ही थकलात का?

506.Blow the horn. (ब्लो द हॉर्न.) - हॉर्न वाजव. हॉर्न वाजवा.

507.Bring it home. (ब्रिंग इट होम.) - ते घरी आण.

508.Call me later. (कॉल मी लेटर.) - मला नंतर बोलव! मला नंतर फोन कर!

509.Can Geeta do it? (कॅन गीता डू इट?) - गीता करू शकेल का?

510.Come back, OK? (कम बॅक, ओके?) - परत ये, बरं का? परत या, बरं का?

511.Come tomorrow. (कम टुमॉरो.) - उद्या ये. उद्या या.

512.Cook the rice. (कुक द राईस.) - भात शिजव. भात शिजवा.

513.Dance with me. (डान्स विथ मी.) - माझ्याबरोबर नाच. माझ्याबरोबर नाचा.

514.Do it quickly. (डू इट क्विकली.) - लवकर कर. लवकर करा.

515.Do that later. (डू दॅट लेटर.) - ते नंतर कर. ते नंतर करा.

516.Does Gauri know? (डझ गौरी नो?) - गौरीला माहीत आहे का?

517.Don't call me. (डोन्ट कॉल मी.) - मला फोन करू नको.मला फोन करू नका.

518.Don't come in. (डोन्ट कम इन.) - आत येऊ नको. आत येऊ नका.

519.Don't do this.(डोन्ट डू दिस.) -  हे करू नका. असं करू नका.

520.Don't open it. (डोन्ट ओपन इट.) - ते उघडू नकोस. ते उघडू नका.

521.Don't tell me. (डोन्ट टेल मी.) - मला सांगू नका. मला सांगू नकोस.

522.Eat and drink. (ईट अँड ड्रिंक.) - खा आणि पी.खा आणि प्या.

523.Eat something. (ईट समथिंग.) - काहीतरी खा. काहीतरी खाऊन घे.

524.Flowers bloom. (फ्लावर्स ब्लूम.) - फुले फुलतात.

525.Get undressed. (गेट अंड्रेस्ड.) - कपडे काढ. कपडे काढा.

526.Give him time. (गिव्ह हिम टाइम.) - त्याला वेळ दे. त्याला वेळ द्या.

527.Give it to me! (गिव्ह इट टू मी!) - मला दे! मला द्या!

528.Give me a day. (गिव्ह मी अ डे.) - मला एक दिवस द्या. मला एक दिवस दे.

529.Give me those. (गिव्ह मी दोज.) - ते मला दे. ते मला द्या.

530.God knows why. (गॉड नोज व्हाय.) - का ते देव जाणे.

531.Have some tea. (हॅव सम टी.) - थोडासा चहा घ्या.

532.He dug a hole. (ही डग अ होल.) - त्याने एक खड्डा खोदला.

533.He got caught. (ही गॉट कॉट.) - तो पकडला गेला.

534.He has a book. (ही हॅज अ बुक.) - त्याच्याकडे एक पुस्तक आहे.

535.He is a thief. (ही इज अ थीफ.) - तो चोर आहे. तो एक चोर आहे.

536.He is at home. (ही इज अॅट होम.) - तो घरी आहे.

537.He is my boss. (ही इज माय बॉस.) - तो माझा बॉस आहे.

538.He is reading.(ही इज रीडिंग.) -  तो वाचत आहे.

539.He knows lots. (ही नोज लॉट्स.) - त्याला बरेच काही माहीत आहे.

540.He lied to me. (ही लाईड टू मी.) - तो माझ्याशी खोटं बोलला.

541.He liked that. (ही लाईक्ट दॅट.) - त्याला ते आवडलं.त्याला ते आवडले.

542.He talks well. (ही टॉक्स वेल.) - तो चांगला बोलतो.तो बर्‍यापैकी बोलतो.

543.He tricked me. (ही ट्रिक्ट मी.) - त्याने मला फसवलं.त्याने मला फसवले. 

544.He went blind. (ही वेंट ब्लाइंड.) - तो आंधळा झाला.

545.He's innocent. (ही'ज इनोसंट.) - तो निर्दोष आहे.

546.He's studying. (ही'ज स्टडिंग.) - तो अभ्यास करतोय.

547.He's very ill. (ही'ज व्हेरी इल.) - तो खूप आजारी आहे.

548.He's your son. (ही'ज युअर सन.) - तो तुझा मुलगा आहे.तो तुमचा मुलगा आहे.

549.His nose bled. (हिस नोज ब्लेड.) - त्याच्या नाकातून रक्त आलं.

550.How beautiful ! (हाऊ ब्युटिफुल!) - किती सुंदर !

551.How can it be? (हाऊ कॅन इट बी?) - हे कसे असू शकते? असं कसं असू शकतं? कसं असू शकतं?

552.Hurry up, Dinesh. (हरी अप, दिनेश.) - लवकर कर, दिनेश.

553.I always walk. (आय ऑल्वेज वॉक.) - मी नेहमीच चालतो.

554.I am sneezing. (आय अॅम स्निझिंग.) - मी शिंकत आहे.मी शिंकतोय.मी शिंकतेय.

555.I became rich. (आय बिकेम रिच.) - मी श्रीमंत झालो. मी श्रीमंत झाले.

556.I can't dance. (आय कान्ट डान्स.) - मला नाचता येत नाही.मी नाचू शकत नाही.

557.I cried a lot. (आय क्राईड अ लॉट.) - मी खूप रडलो. मी खूप रडले.

558.I cried again. (आय क्राईड अगेन.) - मी पुन्हा रडलो. मी पुन्हा रडले.

559.I denied that. (आय डिनाईड दॅट.) - मी ते नाकारलं.मी ते नाकारले.

560.I did nothing. (आय डिड नथिंग.) - मी काही केलं नाही.मी काही केले नाही.

561.I didn't call. (आय डिडन्ट कॉल.) - मी फोन केला नाही.

562.I didn't know. (आय डिडन्ट नो.) - मला माहीत नव्हतं.

563.I didn't stop. (आय डिडन्ट स्टॉप.) - मी थांबलो नाही. मी थांबले नाही.

564.I don't dream. (आय डोन्ट ड्रीम.) - मला स्वप्नं पडत नाहीत.मी स्वप्न पाहत नाही.

565.I dye my hair. (आय डाय माय हेअर.) - मी माझे केस रंगवतो. मी माझे केस रंगवते.

566.I fear no one. (आय फिअर नो वन.) - मी कोणालाही भीत नाही.मला कुणाचीही भीती वाटत नाही.

567.I found a job. (आय फाऊंड अ जॉब.) - मला एक नोकरी मिळाली.

568.I have a cold. (आय हॅव अ कोल्ड.) - मला सर्दी झाली आहे.

569.I have a ring. (आय हॅव अ रिंग.) - माझ्याकडे आंगठी आहे.

570.I ignored Sarika. (आय इग्नोर्ड सारिका.) - मी सारिकाकडे दुर्लक्ष केलं.

571.I lied to Suresh. (आय लाईड टू सुरेश.) - मी सुरेशशी खोटं बोललो. मी सुरेशशी खोटं बोलले.

572.I lied to you. (आय लाईड टू यू.) - मी तुझ्याशी खोटं बोललो. मी तुझ्याशी खोटं बोलले.मी तुम्हाला खोटे बोललो.

573.I looked away. (आय लुक्ट अवे.) - मी लक्ष्य वळवलं.

574.I made dinner. (आय मेड डिनर.) - मी जेवण बनवलं. मी रात्रीचं जेवण बनवलं.

575.I need a loan. (आय नीड अ लोन.) - मला कर्जाची गरज आहे.मला कर्ज हवे आहे.

576.I read a book. (आय रीड अ बुक.) - मी एक पुस्तक वाचलं.मी पुस्तक वाचले.

577.Oh, I got it. (ओह, आय गॉट इट.) - अच्छा, समजलं.

578.Tell us more. (टेल अस मोर.) - आम्हाला अजून सांगा.

579.Who ran away? (हू रॅन अवे?) - कोण पळून गेलं? कोण पळाला?

580.Who resigned? (हू रिजाईन्ड?) - कोणी राजीनामा दिला? राजीनामा कोणी दिला?

581.Who sent Rajesh? (हू सेंट राजेश?) - राजेशला कोणी पाठवलं?

582.Who sent you? (हू सेंट यू?) - तुला कोणी पाठवलं? तुम्हाला कोणी पाठवलं?

583.Who told Sagar? (हू टोल्ड सागर?) - सागरला कोणी सांगितलं?

584.Who told you? (हू टोल्ड यू?) - तुला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं?

585.Who was here? (हू वॉज हिअर?) - इथे कोण होतं? इथे कोण होता?

586.Who was that? (हू वॉज दॅट?) - तो कोण होता? कोण होता तो ?

587.Who will win? (हू विल विन?) - कोण जिंकेल?

588.Who wrote it? (हू रोट इट?) - कोणी लिहिलं ? हे कोणी लिहिले ?

589.Who'll fight? (हू'ल फाईट?) - कोण लढेल ?

590.Who's coming? (हू'ज कमिंग?) - कोण येत आहे?

591.Who's crying? (हू'ज क्रायिंग?) - कोण रडतंय? कोण रडत आहे ?

592.Who's hungry? (हू'ज हंग्री?) - कोणाला भूक लागली?

593.Will this do? (विल दिस डू?) - हे चालेल का? असं चालेल का?

594.You are good. (यू आर गुड.) - तू चांगला आहेस. तू चांगली आहेस. तुम्ही चांगले आहात.

595.You are late. (यू आर लेट.) - तुला उशीर झाला.

596.You are rich. (यू आर रिच.) - तू श्रीमंत आहेस. तुम्ही श्रीमंत आहात.

597.You can't go. (यू कान्ट गो.) - तू जाऊ शकत नाहीस.

598.You will eat. (यू विल ईट.) - तू खाशील.

599.You're lying! (यू'र लायिंग!) - तू खोटं बोलतोयस! तुम्ही खोटं बोलत आहात! आपण खोटे बोलत आहात!

600.You're small.(यू'र स्मॉल.) -  तू छोटा आहेस. तू छोटी आहेस. तुम्ही छोटे आहात.

       (भाग 5)                (भाग 7)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Featured Post

सोपे इंग्रजी संवाद – Beginner साठी. Easy English Talks for Beginners.

सोपे इंग्रजी संवाद – Beginner साठी.  Easy English Talks for Beginners.    easy-english-conversations-for-beginners 👥 Conversation 1. 1....

Popular Posts