Jun 11, 2025

100 सामान्य ज्ञान प्रश्न general-knowledge-in-marathi

100 सामान्य ज्ञान प्रश्न. General-Knowledge-In-Marathi

general-knowledge-in-marathi
general-knowledge-in-marathi

 

प्रश्न 1. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?
उत्तर: हमिंग बर्ड.

प्रश्न 2. हमिंग बर्ड या पक्ष्याच्या पंखांची 1 सेकंदात  किती वेळा हालचाल होते?
उत्तर: जवळपास 50 ते 80 वेळा.

प्रश्न 3. भारताची राजधानी कोणती आहे?
उत्तर: नवी दिल्ली.

प्रश्न 4. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव कोण होता?
उत्तर: नील आर्मस्ट्राँग

प्रश्न 5. पृथ्वीवरील सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे?
उत्तर: ब्लू व्हेल.

प्रश्न 6. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते?
उत्तर: महात्मा गांधी.

प्रश्न 7. भारतात सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर: कांचनजंगा.

प्रश्न 8. संगणकाचा शोध कोणी लावला?
उत्तर: चार्ल्स बॅबेज.

प्रश्न 9. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ.

प्रश्न 10. मानवाचे हृदय एका मिनिटाला किती वेळा धडधडते?
उत्तर: सरासरी 72 वेळा.

प्रश्न 11. क्रिकेटचा जनक कोण मानला जातो?
उत्तर: डब्ल्यूजी ग्रेस.

प्रश्न 12. प्रकाशाचा वेग किती असतो?
उत्तर: ३ लाख किलोमीटर प्रति सेकंद.

प्रश्न 13. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर: गंगा.

प्रश्न 14. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला?
उत्तर: थॉमस अल्वा एडिसन.  

प्रश्न 15. मानवाच्या शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर: त्वचा.

प्रश्न 16. हमिंग बर्ड या पक्षाचे ह्रदय एका मिनिटात किती वेळा धडकते?
उत्तर: साधारण 1260 वेळा.

प्रश्न 17. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तर: मोर.

प्रश्न 18. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
उत्तर: H₂O.

प्रश्न 19. शरीरात रक्त निर्माण कुठे होते?
उत्तर: अस्थिमज्जेमध्ये (Bone marrow).

प्रश्न 20. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो?
उत्तर: 5 जून.

प्रश्न 21. पृथ्वीवर सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे?
उत्तर: माउंट एव्हरेस्ट.

प्रश्न 22. रंगांची छटा मोजण्याचे साधन कोणते आहे?
उत्तर: स्पेक्ट्रोफोटोमीटर.

प्रश्न 23. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर: गुरु.

प्रश्न 24. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर: पं. जवाहरलाल नेहरू.

प्रश्न 25. टायफून ही कोणत्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे?
उत्तर: चक्रीवादळ.

प्रश्न 26. डोळ्यांचा सर्वसामान्य रंग कोणता?
उत्तर: तपकिरी.

प्रश्न 27. डॉल्फिन कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
उत्तर: सस्तन (माशाच्या जातीतील).

प्रश्न 28. रक्तदाब मोजणारे यंत्र कोणते?
उत्तर: स्फिग्मोमॅनोमीटर.

प्रश्न 29. भारताचे अधिकृत चलन कोणते?
उत्तर: रुपया.

प्रश्न 30. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
उत्तर: पॅसिफिक महासागर.

प्रश्न 31. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमळ.

प्रश्न 32. चंद्रावर जाणारी पहिली भारतीय मोहीम कोणती होती?
उत्तर: चांद्रयान-1.

प्रश्न 33. भारतात पहिला रेल्वे प्रवास कधी झाला?

उत्तर: 16 एप्रिल 1853.

प्रश्न 34. सर्वात थंड ग्रह कोणता आहे?
उत्तर: नेपच्यून.

प्रश्न 35. पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास किती वेळ लागतो?

उत्तर: 365 दिवस.

प्रश्न 36. अशोकचक्रात किती आरे आहेत?
उत्तर: 24.

प्रश्न 37. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: 21 जून.

प्रश्न 38. भारताचा संविधान दिन कधी असतो?
उत्तर: 26 नोव्हेंबर.

प्रश्न 39. मानवाच्या शरीरात किती हाडं असतात?
उत्तर: 206.

प्रश्न 40. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर: थार वाळवंट.

प्रश्न 41. पाच ज्ञानेंद्रिये कोणती?
उत्तर: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.

प्रश्न 42. सुर्यप्रकाशात किती रंग असतात?
उत्तर: सात.

प्रश्न 43. भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे?
उत्तर: मुंबई.

प्रश्न 44. भारतातील पहिली महिला रेल्वे ड्रायव्हर कोण होती?
उत्तर: सुरेखा शंकर यादव.

प्रश्न 45. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तर: जन गण मन.

प्रश्न 46.जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?
उत्तर: लाल बहादूर शास्त्री.

प्रश्न 47. भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कोठे सुरु झाली?
उत्तर: मुंबई ते ठाणे.

प्रश्न 48. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे?
उत्तर: चंद्र.

प्रश्न 49. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: गुजरात.

प्रश्न 50. लाल किल्ला कोठे आहे?
उत्तर: दिल्ली.

प्रश्न 51. पक्ष्यांचे पंख कोणत्या पदार्थाचे बनलेले असतात?
उत्तर: केराटिन.

प्रश्न 52. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर: हॉकी.

प्रश्न 53. भारतातील सर्वात प्राचीन भाषा कोणती मानली जाते?
उत्तर: संस्कृत.

प्रश्न 54. जगातील सर्वात मोठी मानवी बनावट भिंत कोणती आहे?
उत्तर: चीनची महाकाय भिंत.

प्रश्न 55. कोणता ग्रह "लाल ग्रह" म्हणून ओळखला जातो?
उत्तर: मंगळ (Mars).

प्रश्न 56. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद.

प्रश्न 57. भारतातील सर्वात जास्त रेल्वे स्टेशन असलेले राज्य कोणते?

उत्तर: उत्तर प्रदेश.

प्रश्न 58. भारतात एकच गाव आहे जेथे घरांना दरवाजेच नाहीत. ते गाव कोणते?
उत्तर: शनि शिंगणापूर (महाराष्ट्र).

प्रश्न 59. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग झाडं कशासाठी करतात?
उत्तर: अन्न तयार करण्यासाठी.

प्रश्न 60. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?
उत्तर: वडाचे झाड.

प्रश्न 61. जगातील सर्वात मंद व आळशी प्राणी कोणता?
उत्तर: स्लॉथ.

प्रश्न 62. जगातील सर्वात मोठे फूल कोणते?
उत्तर: रॅफ्लेसिया अर्नोल्डी.

प्रश्न 63. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर: अंटार्क्टिका वाळवंट.

प्रश्न 64. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
उत्तर: ग्रीनलँड.

प्रश्न 65.संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात?
उत्तर: CPU. (Central Processing Unit).

प्रश्न 66. पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: 24 तास.

प्रश्न 67. जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे?
उत्तर: किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ (सौदी अरेबिया).

प्रश्न 68. गंगा नदी कुठून उगम पावते?
उत्तर: गंगोत्री.

प्रश्न 69. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅटिकन सिटी.

प्रश्न 70. भारतातील सर्वात जुनी संस्कृती कोणती आहे?
उत्तर: सिंधू संस्कृती.

प्रश्न 71. जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता आहे?

उत्तर: पापुआ न्यू गिनी (850 हून अधिक भाषा).

प्रश्न 72. 'भारताचे ताज' म्हणून कशाला ओळखले जाते?
उत्तर: ताज महाल.

प्रश्न 73. कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात?
उत्तर: नारळ.

प्रश्न 74. भारतात गणपती उत्सव सर्वप्रथम कोणी सुरू केला?
उत्तर: लोकमान्य टिळक.

प्रश्न 75. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते?
उत्तर: कानात.

प्रश्न 76. भारतीय गणिताचे जनक कोण मानले जातात?
उत्तर: आर्यभट्ट.

प्रश्न 77. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?
उत्तर: मांडीचे हाड (फीमर).

प्रश्न 78. भारताच्या तिरंग्यातील तीन रंग कोणते?
उत्तर: केशरी, पांढरा, हिरवा.

प्रश्न 79. प्राचीन जगातील एकमेव टिकून असलेलं आश्चर्य कोणते आहे?
उत्तर: गिझाचा ग्रेट पिरॅमिड (इजिप्त).

प्रश्न 80. 'ताजमहाल' कुठे आहे?
उत्तर: आग्रा, भारत.

प्रश्न 81. 'ताजमहाल' कुणी बांधला होता?
उत्तर: मुघल सम्राट शाहजहाँ.

प्रश्न 82. 'ग्रेट वॉल ऑफ चायना' किती लांब आहे?
उत्तर: सुमारे 21,000 किलोमीटर.

प्रश्न 83. कुठल्या प्राण्याचे रक्त निळे असते?
उत्तर: ऑक्टोपस.

प्रश्न 84. आपल्या शरीरात किती स्नायू असतात?
उत्तर: ६०० पेक्षा जास्त.

प्रश्न 85. पेरू मध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते?
उत्तर: C.

प्रश्न 86. सूर्य आपल्यापासून किती दूर आहे?
उत्तर: अंदाजे 15 कोटी किलोमीटर.

प्रश्न 87. भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून कोण ओळखले जातात?

उत्तर: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.

प्रश्न 88. भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते?

उत्तर: आर्यभट्ट.

प्रश्न 89. 'इस्रो' ची स्थापना कधी झाली?
उत्तर: 15 ऑगस्ट 1969.

प्रश्न 90. इस्रोचे संस्थापक कोण होते?
उत्तर: डॉ. विक्रम साराभाई.

प्रश्न 91. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते?
उत्तर: राकेश शर्मा.

प्रश्न 93. मंगळ ग्रहावर यशस्वी मोहीम करणारा पहिला आशियाई देश कोणता?
उत्तर: भारत (मंगळयान, 2013).

प्रश्न 94. पिकासो कोण होते?
उत्तर: प्रसिद्ध चित्रकार.

प्रश्न 95. भारताने कोणत्या वर्षी चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं?
उत्तर: 2023.

प्रश्न 96. कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे?
उत्तर: बुध (Mercury).

प्रश्न 97. भारताचे चलन कोण तयार करते?
उत्तर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.

प्रश्न 98. चंद्र पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती दिवस घेतो?
उत्तर: २७.३ दिवस.

प्रश्न 99. इलेक्ट्रॉनच्या शोधाचे श्रेय कुणाला दिलं जातं?
उत्तर: जे. जे. थॉमसन.

प्रश्न 100. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
उत्तर: राजस्थान.

प्रश्न 101. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

उत्तर: गोवा.

No comments:

Post a Comment

Featured Post

Masculine and Feminine Gender words in English and Marathi

Masculine and Feminine Gender words in English and Marathi   masculine-and-feminine-gender-words-in-english-and-marathi Masculine: (पुल्लि...

Popular Posts