Jun 14, 2025

विभाज्यतेच्या कसोट्या divisibility rules

विभाज्यतेच्या कसोट्या


 
vibhajyatechya-kasotya

vibhajyatechya-kasotya


२ ची कसोटी

* ज्या संख्येच्या एकक स्थानी २,,,,० हे अंक येतात त्या संख्येला २ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २  ने विभाज्य असते.

उदा. ३२,६४,४६,७८,९० इ.

  ची कसोटी 

* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येलाही ३ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३ ने विभाज्य असते.

उदा. ५७३ = ५+७+३= १५

१५ ला ३ ने भाग जातो म्हणून ५७३ या संख्येलाही ३ने निःशेष भाग जातो.

  ची कसोटी

* दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना ४ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ४ ने विभाज्य असते.

उदा. ५८७४२४,३४८७१५२,७३२ इ.

यात ५८७४२४  या संख्येतील शेवटचे दोन अंक २४ आहेत.२४ या संख्येस ४ ने पूर्ण भाग जातो म्हणून ५८७४२४ या संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो.

  ची कसोटी

* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५  हे अंक येतात त्या संख्येला ५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ५ ने विभाज्य असते.

उदा. ५३० ,४९५, २१५,६७० इ.

  ची कसोटी

* ज्या संख्येला  २ ने व ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ६ ने विभाज्य असते.

उदा. १२,५४,१०८,२७३६ इ.

  ची कसोटी

* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ९ ने भाग जातो त्या संख्येलाही ९  ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या  ९ ने विभाज्य असते.

उदा. ५३८४७  = ५+३+८+४+७= २७

यात २७  ला ९ ने भाग जातो म्हणून ५३८४७ या संख्येलाही ९ ने निःशेष भाग जातो.

१०  ची कसोटी

* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० हा  अंक येतो  त्या संख्येला १० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १०  ने विभाज्य असते.

उदा. ३० ,४५० , २७६०,९५४७०  इ.

११   ची कसोटी

* दिलेल्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज करून व विषम स्थानच्या अंकांची बेरीज करून त्यांच्यातील फरक काढला असता तो ० किंवा ११ च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला ११  ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ११  ने विभाज्य असते.

उदा. (१) ५२९५६२

५+९+६=२० आणि  २+५+२ =९  आता वजाबाकी करू २०-९=११ 

म्हणून ५२९५६२ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.

(२) ४५३२४.

४+३+४=११ आणि ५+२=७ आता वजाबाकी करू ११-७=४

म्हणून ४५३२४ हि संख्या ११ ने विभाज्य नाही.

(३) ८९४६३.

८+४+३=१५ आणि ९+६=१५ आता वजाबाकी करू १५-१५=०

म्हणून ८९४६३ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.

१२  ची कसोटी 

* ज्या संख्येला  ३ ने व ४ ने भाग जातो त्या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १२ ने विभाज्य असते.

उदा. ४८,१०८,३००  इ.

१५  ची कसोटी

* ज्या संख्येला  ३ ने व ५ ने भाग जातो त्या संख्येला १५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १५ ने विभाज्य असते.

उदा. ४५,९०,१८०,१८६०  इ.

१८  ची कसोटी 

* ज्या संख्येला २ ने व ९ ने भाग जातो त्या  संख्येला १८ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १८ ने विभाज्य असते.

उदा. १२६,८१०,२७७२  .

२० ची कसोटी

* ज्या संख्येला ४ व ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २० ने विभाज्य असते.

उदा.५४०,१७४०,१६९८० इत्यादी.

२१ ची कसोटी

* ज्या संख्येला ७ व ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २१ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २१ ने विभाज्य असते.

उदा. ४८३,२०१६,१२३२७ इत्यादी

२२ ची कसोटी

* ज्या संख्येला २ व ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २२ ने विभाज्य असते.

उदा. ७९२,१८२६,१५०४८ इत्यादी

२४ ची कसोटी

* ज्या संख्येला ३ व ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २४ ने विभाज्य असते.

उदा. १२९६,२२५६,२०७१२ इत्यादी

३० ची कसोटी

* ज्या संख्येला ३ व १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस ३० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३० ने विभाज्य असते.

उदा. १२००,२८८०,२९६१० इत्यादी  

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 


No comments:

Post a Comment

Featured Post

वाक्प्रचाराचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग.

                        वाक्प्रचाराचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग  marathi-vakprachar-arth-ani-vakyat-upyog 1.   अंमल चढणे. अर्थ- गुंगी...

Popular Posts