Marathi Vakprachar वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग (भाग 2)
 |
| marathi-vakprachar |
151. चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच सर्व वर्ग चिडीचूप झाला.
152. चेव चढणे :- मांजराला पाहताच कुत्र्याला चेव चढला.
153. छाया शोधणे :- भर उन्हात शेतात चालता चालता सतीश दमला व छाया शोधू लागला.
154. जाहीर करणे :- उद्या शाळेत परीक्षा असल्याचे मुख्याध्यापकांनी जाहीर केले.
155. जिवाचे सोने होणे :- चारही मुले शिकून चांगल्या पदावर नोकरी करत असल्यामुळे सखारामच्या जिवाचे सोने झाले.
156. जीवदान देणे :- सिंहाने उंदराला जीवदान दिले.
157. जीवावर येणे :- उंच डोंगर चढणे रमाच्या जीवावर आले.
158. जीव मेटाकुटीला येणे :- शेतात सतत होणाऱ्या हरणाच्या त्रासामुळे सदुचा जीव मेटाकुटीला आला.
159. जीव सुखावणे :- मुलाने परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून दिनूच्या वडिलांचा जीव सुखावला.
160. झडप घेणे :- घारीने सापावर आकाशातून झडप घातली.
161. डोळा चुकवणे :- लहानसा गोपाळ आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.
162. डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या राजुला पाहून त्याच्या वडीलाचे डोळे भरून आले.
163. डोळे ओले होणे :- अनेक वर्षापासून आपला हरवलेला मुलगा सापडल्यानंतर आई व मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना अनेकांचे डोळे ओले झाले.
164. डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना आईचे डोळे पाण्याने डबडबले.
165. डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.
166. डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने आपल्या मुलाला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.
167. डोळे दिपणे :- अजिंठ्याच्या लेण्या पाहून रमाचे डोळे दिपले.
168. डोक्यावर घेणे. अर्थ :- अतिलाड करणे.वाक्य :- शंकरचा चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला, तेव्हा बाबांनी त्याला डोक्यावर घेतले.
169. तणतणणे :- राधाला आईने मैत्रिणिकडे जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली.
170. तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे जमिनीला तडे पडतात.
171. तहानभूक हरपणे :- सायकल पहिली की,राजूची तहानभूक हरपते.
172. तर्क करणे :- रमेश मुंबईला गेल्याचे समजताच,तो आपल्या मामाकडे गेला असणार असा आईने तर्क केला.
173. तडाखा बसणे :- मागील वर्षी नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला.
174. ताजेतवाने होणे :- सकाळच्या मोकळ्या हवेत फिरल्याने मी ताजातवाना झालो.
175. ताण येणे :- उद्याच्या इंग्रजीच्या पेपरचा रामच्या मनावर ताण आला.
176. तावडीतून सुटणे :- अखेरीस हरिण वाघाच्या तावडीतून सुटले.
177. ताब्यात देणे :- चोराला पकडल्यानंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
178. तीरासारखे धावणे. अर्थ:- खूप वेगाने धावणे. वाक्य :- राम धावण्याच्या स्पर्धेत तीरासारखा धावतो.
179. तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की आई घरकामाला लागते.
180. तोंडचे पाणी पळणे :- भला मोठा साप दोन पावलांवर पाहताच संतोषच्या तोंडचे पाणी पळाले.
181. तोंडघशी पडणे :- उडी मारताना तोल जाऊन राम तोंडघशी पडला.
182. तोंडातून चकार शब्द न काढणे :- चुकीबद्दल वडील रामवर ओरडले तेव्हा रामच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नाही.
183. तुडुंब भरणे :- पावसाळ्यात गावातील सर्व विहिरी तुडुंब भरतात.
184. त्रेधा-तिरपीट उडणे :- दुपारी येणारे पाहुणे सकाळीच घरी आल्यामुळे आईची त्रेधा-तिरपीट उडाली.
185. त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व देशवासीयांनी विदेशी कपड्यांचा त्याग केला.
186. थक्क करणे :- नाटकातील आपली साधूची जोरदार भूमिका वठवत विशालने सर्वांनाच थक्क केले.
187. थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये रमेश हडकुळा असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.
188. थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या रामने 'मी शाळेत गेलो होतो,' अशी बाबांना थाप मारली.
189. दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.
190. दर्शन घेणे :- शेगावला जाऊन आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
191. दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची आपल्याला कोर्टात दाद मागता येते.
192. दिवस रेटणे :- काही कामगार कारखान्यात काम न करता फक्त दिवस रेटत होते.
193. दिलासा देणे :- महापुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला.
194. दुजोरा देणे :- शाळेची सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.
195. देखरेख करणे :- राम सावकारांच्या शेताची देखरेख करतो.
196. देवाणघेवाण करणे :- चांगल्या विचारांची आपण सर्वांनी देवाणघेवाण केली पाहिजे.
197. देह झिजवणे :- शाहिद भागतसिंगांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.
198. देहभान हरपणे :- खेळताना लहान मुले देहभान हरपतात.
199. धड न समजणे :- छोटा रमण काय बोलत होता ते आम्हा मुलांना धड समजत नव्हते.
200. धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना पकडून गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.
201. धडे देणे : शाळेत मुलांना नम्रतेने वागण्याचे धडे दिले जातात.
202. धपाटे घालणे :- आपला गृहपाठ पूर्ण न करणाऱ्या मुलांच्या पाठीत सर धपाटे घालायचे.
203. ध्यास घेणे : सतिषने भविष्यात क्रिकेटर होण्याचा ध्यास घेतला.
204. धाडस दाखवणे :- रामुने एकट्याने अंधाऱ्या खोलीत प्रवेश करण्याचे धाडस दाखवले.
205. धाप लागणे :- उंच डोंगर चढल्यामुळे निताला धाप लागली.
206. धूम धावत सुटणे :- मांजराला पाहताच उंदीर धूम धावत सुटले.
207. नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात दिनेशने हुबेहूक अनेक कलाकारांच्या आवाजाची नक्कल केली.
208. नजर ठेवणे :- बसस्थानकावर पोलिसांनी पाकीट मारणाऱ्यांवर नजर ठेवली होती.
209. नवल वाटणे :- छोट्याशा रवीने स्वतः सायकल तयार केलेली पाहून त्याच्या आईला नवल वाटले.
210. नजर चुकवणे :- पिंकीने आईची नजर चुकवून डब्यातील लाडू काढले.
211. नाव गाजने :-भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकून जगात भारताचे नाव गाजवले.
212. नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे.वाक्य :- दहावीच्या वार्षिक परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून दिनेशने नाव मिळविले.
213. निरीक्षण करणे :- पोलिसांनी अपघात झालेल्या जागेचे निरीक्षण केले.
214. निष्ठा असणे :-राधाची आपल्या वर्गशिक्षिकेवर खूप निष्ठा होती.
215. निपचित पडून राहणे :- आजारी असलेला वाघ प्राणीसंग्रहालयात निपचित पडून होता.
216. पर्वा नसणे :- पाण्यात बुडणाऱ्या सागरला वाचवताना गणेशने आपल्या जीवाची पर्वा केली नाही.
217. पश्चात्ताप होणे :- ज्या सतिशला आपण नेहमी तुच्छ समजून हसत होतो त्यानेच आपल्याला संकट काळात मदत केली याचा गणेशला पश्चाताप झाला.
218. पाया पडणे :- सर्वानी रोज संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पाडाव्यात.
219. पाय ओढणे :- पुढे जाणाऱ्या व्यक्तीचे कुणीही पाय ओढू नयेत.
220. पायाशी बसणे :- आम्ही गावी गेलो की, आमच्या आजोबांच्या पायाशी बसतो.
221. पार पडणे :- शेवटी राधाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
222. पोट भरणे :-सदू दिवसरात्र आपल्या बैलगाडीवर कष्ट करून आपले पोट भरतो.
223. पोटाला चिमटा घेणे :-पोटाला चिमटा घेऊन सदाशिवने आपल्या नंदुला उच्च शिक्षण दिले.
224. पोशिंदा असणे :- शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे.
225. प्रत्युत्तर देणे :- सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला राजू प्रत्युत्तर देत होता.
226. प्रसंग बेतणे :-पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.
227. प्रविष्ट होणे :- काही लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रविष्ट होतात.
228. प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले.
229. पाय धरणे :- हातून घडलेल्या चुकीबद्दल तुकारामने सावकारांचे पाय धरले.
230. प्रेमाचा भुकेला असणे :- लहान मुले प्रेमाची भुकेली असतात.
231. फावला वेळ मिळणे :-फावल्या वेळात रमेश वर्तमानपत्र वाटून आपला शाळेचा खर्च भागवतो.
232. फिर्याद करणे :-जमिनीच्या वादावरून सखारामने आपल्या शेजाऱ्याविरुद्ध फिर्याद केली.
233. बहुमान मिळणे :-क्रिकेटच्या सामन्यात १०० धावा पूर्ण केल्यामुळे सचिनला मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळाला.
234. बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.
235. बाजूस सारणे :- राधाने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.
236. बारा महिने तेरा काळ :- तुकारामची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच असते.
237. बाजार भरणे :- सुट्ट्यामध्ये गावात खेळण्यासाठी मुलांचा बाजार भरतो.
238. बालेकिल्ला असणे :- मुंबई शहर हे उमेदवार देशमुखांचा बालेकिल्ला होता.
239. बावचळणे :- अचानक समोरून आलेल्या हत्तीला पाहून रमेश बावचळला.
240. बुचकळ्यात पडणे :- अर्थ:- गोंधळून जाणे. झोपेतून उठलेल्या बाळाला आपण नवीन घरी आहोत हे समजताच ते बुचकाळ्यात पडले.
241. बेभान होणे :- आपल्या मित्राच्या लग्नात सदाशिव बेभान होऊन नाचला.
242. भाळी असणे :- दिवसभर मोलमजूरी करून पोट भरणे हेच आमच्या कुटुंबाच्या भाळी होते.
243. भांबावून जाणे :- दिवाळीच्या दिवशी अचानक मोठमोठ्या फटाक्यांचा आवाज ऐकून रवी भांबावून गेला.
244. भांबावून जाणे. अर्थ :- गोंधळून जाणे. वाक्य :- गावातील माणसे जेव्हा पहिल्यांदा शहरात येतात, तेव्हा शहरातील गर्दी पाहून ते भांबावून जातात.
245. भीतीने थरथरणे :-गणेशचे गणित चुकल्यामुळे सर त्याच्यावर रागावले, परंतु शाळा सुटल्यावरही तो भीतीने थरथरत होता.
246. भुकेने तडफडणे :-आजारी असलेला सिंह चार दिवसापासून उपाशी असल्यामुळे भुकेने तडफडत होता.
247. भुलून जाणे :- पेंटरने काढलेले ते सुंदर चित्र पाहून सर्व मुले भुलून गेली.
248. भेदरणे :- अपघातात खूप मार लागल्यामुळे सदू खूप भेदरला होता.
249. मन रमणे :- शंकरचे मन फक्त अभ्यासात रमते.
250. मर्जी राखणे. अर्थ :- खूश ठेवणे.वाक्य:-काही राजकीय नेते निवडणूक जवळ आल्यावर जनतेची मर्जी राखायला सुरू करतात.
251. मनाई असणे :-काही ठिकाणी वाहनांना थांबण्यास मनाई असते.
252. मशागत करणे :- शेतात चांगले पीक यावे यासाठी शेतकरी वर्षभर शेतात मशागत करतात.
253. मस्तक आदराने लवणे :- आजही आमच्या शाळेतील शिक्षक दिसले की,आमचे मस्तक आदराने लवते.
254. माघार घेणे :- आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडीने रौद्ररूप धारण केलेले पाहून सापाने माघार घेतली.
255. मान डोलवणे:- वर्गातील काही मुले सरांनी शिकवलेला भाग समजला नाही तरी मान डोलवतात.
256. मातीजमा होणे :- बर्ड फ्लू मुळे अनेक पक्षी मातीजमा झाले.
257. मान खाली घालणे :- खोडी करणाऱ्या रामला सरांनी उभे करून जाब विचारला तेव्हा रामने मान खाली घातली.
258. मान देणे :- आमच्या गावातील सारपंचांना लोक खूप मान देतात.
259. मान हलवणे :- सरांनी शाळेची सहल काढायची का ? असे विचारताच सर्वांनी मान हलवली.
260. मुक्त करणे :- झाडाच्या फांदीत शिंगे अडकलेल्या काळविटाला वन अधिकाऱ्यांनी मुक्त केले.
261. मृत्यू पावणे :- साप चावल्याने कुत्र्याचे पिल्लू मृत्यू पावले.
262. मोह होणे :- सुनीलची नवीन पेन्सिल पाहून अनिलला ती चोरण्याचा मोह झाला.
263. मौन पाळणे :- गुंडांनी भर दिवसा गावातील एका माणसाला मारले तरी गावातील सर्व लोकांनी तोंडातून ब्र न काढता मौन पाळले होते.
264. याचना करणे :- चोराने पोलिसांकडे आपल्याला सोडण्यासाठी याचना केली.
265. येरझारा घालणे :- रात्री उशिरापर्यंत गणेश घरी परतला नाही, म्हणून त्याची आई अंगणातच येरझारा घालत होती.
266. रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.
267. रक्ताचे पाणी करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.वाक्य:- राजुला खूप शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांनी रक्ताचे पाणी केले.
268. रद्द करणे :- कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे या वर्षी परीक्षा रद्द केली गेली.
269. रमून जाणे :- नवीन ठिकाणी गेल्यावरही गणेश लगेच रमून जातो.
270. रवंथ करणे :- शेतातून घरी आल्यावर गाईगुरे रवंथ करत बसतात.
271. रात्रीचा दिवस करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.वाक्य:-शंकरने रात्रीचा दिवस करून परीक्षेत चांगले यश मिळवले.
272. रंगात येणे :- दुपारी मुलांचा गोटयांचा डाव रंगात आला होता.
273. राग येणे :- सदूने आपला शर्ट फाडला म्हणून रामला त्याचा खूप राग आला.
274. राजी असणे :- पोहायला जायचे म्हणताच सर्व मुले लगेच राजी झाली.
275. राब राब राबणे :- सदाशिवचे वडील शेतात दिवसभर राब राब राबतात.
276. रुसून बसणे :- दीपाने आपले खेळणे तोडले म्हणून छोटा गणू रुसून बसला.
277. लगबग असणे :- घरी पाहुणे येणार असल्याने दिनेशच्या घरात दिवसभर लगबग होती.
278. लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे सूर्य लुप्त झाला.
279. लौकिक मिळवणे :- सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळून जगात लौकिक मिळवला.
280. वचन देणे :- यापुढे मी कधीही वाईट काम करणार नाही , असे सूरजने आईला वचन दिले.
281. वर्गवारी करणे :- कब्बड्डीच्या खेळासाठी सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.
282. वाटेकडे कान लावून बसणे :- बाबा आज बाजारातून आपल्यासाठी नवीन पुस्तके आणणार म्हणून मुळे वाटेकडे कान लावून बसली होती.
283. वाईट वाटणे :- राजुचा अपघात झाला हे ऐकून रमेशला खूप वाईट वाटले.
284. विचारपूस करणे :-आमचे सर वर्गात नेहमी कोणताही घटक समजला का नाही याची विचारपूस करतात.
285. विचारविनिमय करणे :- राजूला बारावीनंतर कोठे शिकण्यास पाठवायचे याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.
286. विसर पडणे :- आमच्या मित्रांचे कितीही भांडण झाले तरी आम्हांला त्याचा विसर पडतो.
287. विळखा घालणे :- सापाने कुत्र्याच्या पिल्लाला विळखा घातला.
288. विश्रांती घेणे :- तुकाराम शेतात काम केल्यानंतर दुपारी विश्रांती घेतो.
289. वेष पालटून फिरणे :- पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.
290. शब्द देणे :- आपण यापुढे कधीही खोडी करणार नाही असा रामने आईला शब्द दिला.
291. शब्द मोडणे :- पुन्हा खोटे बोलणार नाही, असे सांगूनही रामेशने आज गुरुजींना दिलेला शब्द मोडला.
292. शरमिंदा होणे :- सवकारांकडे पुन्हा पैसे मागताना सदू शरमिंदा झाला.
293. शान वाढवणे :- बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिला येवून गणेशने आपल्या शाळेची शान वाढवली.
294. शिकवण देणे :- संतांनी लोकांना चांगली शिकवण दिली.
295. शिगेला पोहोचणे :- रंगात आलेला क्रिकेटचा सामना पाहताना उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.
296. शीण येणे :- दिवसभर शेतात काम करून सखारामला शीण आला.
297. सक्रिय सहभाग घेणे :- गावातील सप्त्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गावातील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला.
298. सढळ हाताने मदत करणे :- मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लोकांनी सढळ हातानी मदत केली.
299. सन्मान करणे :- दहावीच्या परीक्षेत राजू पहिला आल्याने मुख्याध्यापकांनी त्याचा सन्मान केला.
300. सल्ला देणे :- आमच्या सरांनी मला नवोदयच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.
वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
No comments:
Post a Comment