Jun 11, 2025

Parts Of Speech–शब्दांच्या जाती

Parts Of Speech – शब्दांच्या जाती

Parts-Of-Speech-English-And-Marathi
Parts-Of-Speech-English-And-Marathi

 

शब्दांच्या जाती:- वाक्यातील प्रत्येक शब्द जे कार्य करतो, त्याला शब्दाची ‘जात’ म्हणतात.

Word - A word is a group of letters that has meaning and is used to speak or write. It is the smallest unit of language that can stand alone and make sense.

शब्द:- विशिष्ट क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर काही अर्थबोध होत असेल तर त्यास ‘शब्द’ असे म्हणतात.  

Sentence:- A sentence means a group of words that makes complete sense.

वाक्य:- विशिष्ट क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर अर्थबोध होत असेल तर त्यास ‘वाक्य’ असे म्हणतात.

There are eight parts of speech in the English language (शब्दांच्या आठ जाती आहेत.)

(अ) विकारी शब्द  

1.Noun (नाम)

2. Pronoun – (सर्वनाम)

3. Adjective – (विशेषण)

4. Verb – (क्रियापद)

(आ) अविकारी शब्द

5. Adverb – (क्रियाविशेषण अव्यय)

6. Preposition – (शब्दयोगी अव्यय)

7. Conjunction – (उभयान्वयी अव्यय)

8. interjection – (केवलप्रयोगी अव्यय)

1.Noun (नाम):- All the naming words are called nouns.

Ex. Savita, Mumbai, Tiger, Sugar, Table etc.

1.नाम:- एखाद्या प्राण्याच्या, पदार्थाच्या, वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.

उदा.सविता, मुंबई, वाघ, साखर, टेबल इत्यादी.

2. Pronoun (सर्वनाम)A pronoun is a type of word that replaces a noun.

Ex.I, you, me, he, she, it, they, we, etc.

२. सर्वनाम:- नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.

उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे इत्यादी.

3. Adjective (विशेषण) – Adjectives are words that tell us more about nouns.

Ex.tiny, red, two, some, beautiful etc.

३. विशेषण:- नामबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ‘विशेषण’ असे म्हणतात.

उदा. काळा, सुंदर, मोठे, आंबट, हसरा इत्यादी.

4. Verb (क्रियापद) – Verbs are words that show the action or state of being of a person, or thing.

Ex.reading, watching, playing, eating etc.

४. क्रियापद:- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद’ असे म्हणतात.

उदा. खातो, पितो, नाचतो, गातो, पोहतो, जातो इत्यादी.

5. Adverb – (क्रियाविशेषण अव्यय):- Words which tell us more about a verb are known as adverbs.

Ex. Slowly, everyday, everywhere etc.

५. क्रियाविशेषण अव्यय:- क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला ‘क्रियाविशेषण अव्यय’ असे म्हणतात.

उदा. दररोज, सर्वत्र, हळूहळू, खूपदा इत्यादी.

6. Preposition – (शब्दयोगी अव्यय):-A preposition shows the relation of a noun to other words in a sentence.

Ex. behind, under, on, in, beside etc.

 ६. शब्दयोगी अव्यय:- नाम व सर्वनाम यांना जोडून आलेल्या अविकारी शब्दाला ‘शब्दयोगी अव्यय’ असे म्हणतात.

उदा. शाळेपुढे, त्याच्याशिवाय, सलीलसारख्या, सरितेपेक्षा, मुलांसाठी इत्यादी.

7. Conjunction – (उभयान्वयी अव्यय):- Conjunctions are words that join sentences and groups of words.

Ex. and, but, because, so, or etc.

७. उभयान्वयी अव्यय:- दोन किंवा अधिक शब्द, तसेच दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.

उदा. व, किंवा, शिवाय, अथवा, पण, परंतु, जर, तर इत्यादी.

8. interjection – (केवलप्रयोगी अव्यय):- An interjection is a word used merely to express some sudden feelings of the mind.

Ex. Hey!, Hi!, Oh!, Ow!, Ugh!, Huh!, Uh-oh!, Whoops!, Yikes!, Meh!, Yuck!, Wow!, Phew!, Hurrah!, Alas!, Hush! Etc.

८. केवलप्रयोगी अव्यय:- उत्स्फूर्तपणे भावना प्रकट करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला ‘केवलप्रयोगी अव्यय’ असे म्हणतात.

उदा. अबब!, शाब्बास!, अरेरे!, अहाहा!, बापरे! इत्यादी. 

यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.          

No comments:

Post a Comment

Featured Post

Masculine and Feminine Gender words in English and Marathi

Masculine and Feminine Gender words in English and Marathi   masculine-and-feminine-gender-words-in-english-and-marathi Masculine: (पुल्लि...

Popular Posts