Jun 10, 2025

Vakprachar,वाक्प्रचार आणि अर्थ

 

vakprachar
vakprachar


1.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे.

2.  अंग चोरणे – फारच होडे काम करणे.

3.  अंग धरणे - लठ्ठ होणे.

4.  अंगवळणी पडणे – सवय होणे.

5.  अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

6.  अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे.

7.   अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे.

8.   अंगाला होणे - अंगाला छान बसणे.

9.   अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

10.  अंगावर काटा येणे - भीती वाटणे.

11.  अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

12.  अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे.

13.  अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे.

14.  अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.

15.  अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे.

16.  अग्निदिव्य करणे- कठीण कसोटीला उतरणे.

17.  अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

18.  अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे.

19.  अट्टहास करणे - आग्रह धरणे.

20.  अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.

21.  अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

22.  अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.

23.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

24.  अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे.

25.  अनमान करणे - संकोच करणे.

26.  अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

27.  अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

28.  अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

29.  अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

30.  अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

31.  अभंग असणे - अखंड असणे.

32.  अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

33.  अमलात आणणे - कारवाई करणे.

34.  अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

35.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.

36.  अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे.

37.  आंदण देणे - देऊन टाकणे.

38.  आंबून जाणे – विटून जाणे,थकणे.

39.  आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.

40.  आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

41.  आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

42.  आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.

43.  आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट.

44.  आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

45.  आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

46.  आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

47.  आच लागणे - झळ लागणे.

48.  आड येणे - अडथळा निर्माण करणे.

49.  आडाखे बांधणे- मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

50.  आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.

51.  आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे.

52.  आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.

53.  आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.

54.  आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.

55.  आयोजित करणे - सिद्धता करणे.

56.  आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.

57.  इतिश्री करणे - शेवट करणे.

58.  उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे.

59.  उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

60.  उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

61.  उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.

62.  उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

63.  उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे.

64.  उताणा पडणे - पराभूत होणे.

65.  उत्पात करणे - विध्वंस करणे.

66.  उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

67.  उदास होणे - खिन्न होणे.

68.  उद्ध्वस्त होणे- नाश पावणे.

69.  उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

70.  उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.

71.  उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे.

72.  उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.

73.  उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

74.  उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.

75.  उसंत मिळणे - वेळ मिळणे.

76.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

77.  ऊर भरून येणे – गदगदून येणे.

78.  ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

79.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

80.  ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.

81.  ओढा असणे - कल असणे.

82.  अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे.

83.  ओनामा- प्रारंभ.

84.  कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.

85.  कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

86.  कंठस्नान घालणे- ठार मारणे.

87.  कंपित होणे- थरथरणे,थरथर कापणे.

88.  कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

89.  कच्छपी लागणे - नादी लागणे.

90.  कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे.

91.  कणव असणे- आस्था किंवा करुणा असणे.

92.  कणीक तिंबणे - खूप मार देणे.

93.  कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

94.  कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.

95.  कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे.

96.  कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.

97.  कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.

98.  कहर करणे - अतिरेक करणे.

99.  काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे.

100. काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

101. कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे.

102.काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

103.काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

104.काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे.

105. काणाडोळा करणे- दुर्लक्ष करणे.

106.कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.

107. कान उपटणे – कडक शब्दात समज देणे.

108.कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.

109. कान निवणे – ऐकून समाधान होणे.

110. कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे.

111. कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे.

112.कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे.

113.कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

114. कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे.

115. कानावर घालणे – लक्षात आणून देणे.

116. कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे.

117. कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.

118. कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

119. कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे.

120.काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

121. काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे.

122. काळीज उडणे - भीती वाटणे.

123. काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

124.काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे.

125. कावराबावरा होणे – बावरणे.

126. किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

127. कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

128. कुणकुण लागणे - चाहूल लागणे.

129. कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

130. कूच करणे - वाटचाल करणे.

131. केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे.

132. कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

133. कोडकौतुक होणे - लाड होणे.

134. कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे.

135.खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

136. खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे.

137. खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.

138. खडे फोडणे - दोष देणे.

139. खपणे – कष्ट करणे,झिजणे.

140. खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे.

141. खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.

142. खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.

143. खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

144. खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे.

145. खाल्ल्या घरचे वासे मोजणे- उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे.

146. खितपत पडणे - क्षीण होत जाणे.

147. खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.

148. खो घालणे- विघ्न निर्माण करणे.

149. गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

150. गट्टी जमणे - दोस्ती होणे.

151. गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे.

152. गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.

153. गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.

154. गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे.

155. गळ्यात घोंड पडणे- इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

156. गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.

157. गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे.

158. गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.

159. गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

160. गाडी अडणे – खोळंबा होणे.

161. गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.

162. गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे.

163. गुजराण करणे - निर्वाह करणे.

164.  गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे.

165. गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे.

166. गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.

167. गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे.

168. ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.

169. घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.

170. घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

171. घर धुऊन नेणे- सर्वस्वी लुबाडणे.

172. घागरगडचा सुभेदार – पाणक्या.

173. घाम गाळणे - खूप कष्ट करणे.

174. घालून पाडून बोलणे- दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

175. घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.

176. घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

177. घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

178. घोडे मारणे - नुकसान करणे.

179. चंग बांधणे – निश्चय करणे.

180. चक्कर मारणे - फेरफटका मारणे.

181. चतुर्भुज होणे - लग्न करणे.

182. चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

183. चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

184. चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.

185. चाहूल लागणे - मागोवा लागणे.

186. चितपट करणे – कुस्तीत हरविणे.

187. चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे.

188. चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे.

189. चीतपट करणे- कुस्तीत हरविणे.

190. चुरमुरे खात बसणे - खजील होणे.

191. चेहरा खुलणे - आनंद होणे.

192. चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.

193. छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.

194. छाननी करणे - तपास करणे.

195. जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे.

196. जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे.

197. जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

198. जळफळाट होणे - रागाने लाल होणे.

199. जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.

200. जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.

201. जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे.

202. जिवाची मुंबई करणे- अतिशय चैनबाजी करणे.

203. जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.

204.जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे.

205. जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.

206. जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे.

207. जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

208. जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

209. जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे.

210. जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

211. जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.

212. जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.

213. जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे.

214. जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे.

215. जीव वरखाली होणे – घाबरणे.

216. जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.

217. जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

218. जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

219. जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.

220. जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.

221. ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे.

222. झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

223. झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य.

224. झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे.

225. टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

226. टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

227. टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

228. टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे.

229. टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.

230. ठसा उमटवणे - छाप पाडणे.

231. ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.

232. डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

233. डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे.

234. डाव येणे - खेळात राज्य येणे.

235. डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.

236. डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

237.  डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

238.  डोक्यावर घेणे - अति लाड करणे.

239. डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.

240. डोळा असणे – पाळत ठेवणे.

241. डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे.

242. डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे.

243. डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.

244. डोळे दिपवले - थक्क करून सोडणे.

245. डोळे निवणे - समाधान होणे.

246.डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे.

247. डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे.

248. डोळे फिरणे  - खूप घाबरणे.

249. डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे.

250. डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.

251. डोळे वटारणे - रागाने बघणे.

252. डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे.

253. डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

254. डोळ्यांत खुपणे - सहन न होणे.

255. डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.

256. डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

257. डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.

258. डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे.

259. डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.

260. डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.

261.  डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.

262.  डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे.

263.  तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे.

264.  तजवीज करणे - तरतूद करणे.

265.  तडीस नेणे - पूर्ण करणे.

266. तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

267. तळहातावर शिर घेणे- जिवावर उदार होणे.

268. ताट वाढणे - जेवायला वाढणे.

269. ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.

270. तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

271. तारांबळ होणे - घाईगडबड उडणे.

272. ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.

273. तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे.

274.  तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे.

275. तोंड काळे करणे- नाहीसे होणे,दृष्टीआड होणे.

276. तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे.

277. तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे.

278. तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे.

279. तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे.

280. तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे.

281. तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे.

282. तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे.

283. तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे.

284. तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.

285. तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे.

286. तोंडाला पाने पुसणे – फसवणे.

287. तोंडावाटे ' ब्र ' न काढणे- एकही शब्द न उच्चारणे.

288.  तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.

289. तोंडून अक्षर न फुटणे- घाबरून न बोलणे.

290. राटिका - कजाग बायको.

291. थांग न लागणे - कल्पना न येणे.

292. थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

293. दक्षता घेणे - काळजी घेणे.

294. दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

295. दगा देणे – फसवणे.

296. दडी मारणे - लपून राहणे.

297. दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे.

298. दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे.

299.  दबा धरून बसणे - टपून बसणे.

300. दाढी धरणे - विनवणी करणे.

301. दात ओठ खाणे – चीड व्यक्त होणे, द्वेषाची भावना दाखवणे.

302. दात धरणे - वैर बाळगणे.

303. दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे, बोलती बंद होणे.

304. दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

305. दातास दात लावून बसणे - काही न खाता उपाशी राहणे.

306. दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

307. दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

308. दिवस बुडून जाणे - सूर्य मावळणे.

309. दिशा फुटेल तिकडे पडणे - सैरावैरा पळणे.

310. दुःखावर डागण्या देणे – दु:खी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे.

311. दुधात साखर पडणे – अधिक चांगले घडणे.

312. दुमदुमून जाणे - निनादून जाणे.

313. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

314. देखभाल करणे - जतन करणे.

315. देखरेख करणे - राखण करणे.

316. देणेघेणे नसणे - संबंध नसणे.

317. देहातून प्राण जाणे - मरण येणे.

318. दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.

319. द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

320.धडपड करणे - खूप कष्ट करणे.

321.धन्य होणे - कृतार्थ होणे.

322. धरणे धरणे – हट्ट धरून बसणे.

323. धाबे दणाणणे - खूप घाबरणे.

324. धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा.

325. धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.

326. धास्ती घेणे - धक्का घेणे,घाबरणे.

327. धिंडवडे निघणे - फजिती होणे.

328. धुडगूस घालणे - गोंधळ करणे.

329. धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.

330. धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.

331.  नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे.

332. नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे.

333. नजर करणे - भेटवस्तू देणे.

334. नजर वाकडी करणे - वाईट हेतू बाळगणे.

335. नजरेत भरणे - उठून दिसणे.

336. नसती बिलामत येणे - नसती कटकट ओढवणे.

337.  नांगी टाकणे - हातपाय गाळणे.

338.  नाक कापणे – घोर अपमान करणे.

339. नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.

340.  नाक घासणे - स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

341.  नाक ठेचणे – नक्षा  उतरवणे.

342.  नाक मुठीत धरणे - अगतिक होणे.

343.  नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.

344.  नाक वर असणे – ऐट,दिमाख किंवा ताठा असणे.

345.  नाकाने कांदे सोलणे – स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे.

346.  नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

347.  नाकावर राग असणे - लवकर चिडणे.

348.  नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.

349.  नाकी नऊ येणे – फार दगदग होणे,मेटाकुटीला येणे,फार त्रास होणे.

350.  नाळ तोडणे - संबंध तोडणे.

351.  नाव कमावणे - कीर्ती मिळवणे.

352. निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे.

353.  निद्राधीन होणे – झोपणे.

354.  निवास करणे – रहाणे.

355. निष्प्रभ करणे - महत्व कमी करणे.

356.  नूर पातळ होणे - रूप उतरणे.

357.   पडाव पडणे - वस्ती करणे.

358.  पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

359.  पदरात घालने – चूक पटवून देणे,स्वाधीन करणे.

360.  पदरात घेणे – स्वीकारणे.

361.  पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.

362.  परिपाठ असणे - विशिष्ट पद्धत असणे,नित्यक्रम असणे.

363.  परिसीमा गाठणे – परकोटीला जाणे.

364.  पसंती मिळणे - अनुकूलता लाभणे.

365.  पहारा देणे - राखण करणे.

366.  पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.

367.  पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे, एखादी गोष्ट जन्मापासून असणे.

368.   पाठ थोपटणे – शाब्बासकी देणे,कौतुक करणे.

369.  पाठ दाखवणे - पळून जाणे.

370.  पाठ न सोडणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे.

371.  पाठिंबा देणे - दुजोरा देणे.

372.   पाठीशी घालने - संरक्षण देणे.

373.  पाढा वाचणे - सविस्तर हकीकत सांगणे.

374.  पाणी पडणे - वाया जाणे.

375.  पाणी पाजणे - पराभव करणे.

376.  पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे,गुप्त कट शिजवत असणे.

377.  पाणी सोडणे - आशा सोडणे.

378.  पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.

379.   पादाक्रांत करणे – जिंकणे.

380.  पाय मोकळे करणे – फिरायला जाणे.

381.  पायमल्ली करणे - उपमर्द करणे.

382.  पायाखाली घालने - पादाक्रांत करणे.

383.  पार पाडणे - सांगता करणे,संपवणे,संपन्न होणे,संपवणे,सांगता करणे.

384.  पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.

385.  पाळी येणे - वेळे येणे.

386.  पाहुणचार करणे - आदरातिथ्य करणे.

387.  पिंक टाकणे – थुंकणे.

388.  पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.

389.  पुढाकार घेणे - नेतृत्व करणे.

390.  पुनरुज्जीवन करणे - पुन्हा उपयोगात आणणे.

391.  पोटाची दमडी वळणे - खायला न मिळणे.

392.  पोटात कावळे ओरडणे -  भुकेने व्याकूळ होणे.

393.  पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे.

394.  पोटात घालणे - क्षमा करणे.

395.  पोटात ठेवणे – गुपित सांभाळणे.

396.  पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.

397.  पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.

398.  पोटाला चिमटा घेणे - पोटाला न खाता राहणे.

399.  पोटावर पाय देणे – रोजंदारी बंद करणे,उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे.

400. प्रक्षेपित करणे - प्रसारित करणे.

401. प्रघात पडणे - रीत असणे.

402. प्रचारात आणणे - जाहीरपणे माहिती देणे.

403. प्रतिकार करणे - विरोध करणे.

404. प्रतिबंध करणे - अटकाव करणे.

405. प्रतिष्ठा लाभणे - मान मिळणे.

406. प्रतिष्ठापित करणे- स्थापना करणे.

407.  रत्यय येणे - प्रचीती येणे.

408.   रभावित होणे – छाप पडणे.

409. प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे प्रश्न विचारणे.

410.  प्रस्ताव ठेवणे - ठराव मांडणे.

411.  प्राण कानांत गोळा होणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.

412.  राणाला मुकणे - जीव जाणे,मरण येणे.

413.  प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न करणे.

414.  प्राप्त करणे – मिळवणे.

415.  प्रेरणा मिळणे - स्फूर्ती मिळणे.

416.  फंदात न पडणे - भानगडीत न अडकणे.

417.  फटफटणे - सकाळ होणे.

418.  फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण करणे.

419.   फिदा होणे - खुश होणे.

420. फुटाण्यासारखे उडणे - झटकन राग येणे.

421.  बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.

422.  बडेजाव वाढवणे - प्रौढी मिरवणे.

423. बत्तरबाळ्या होणे - चिंध्या होणे,नासधूस होणे.

424.  बत्तरबाळ्या होणे- नासधूस होणे,चिंध्या होणे.

425.  बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडीत मारणे.

426. बळ लावणे - शक्ती खर्च करणे.

427.  बस्तान ठोकणे - मुक्काम ठोकणे.

428. बहिष्कार टाकणे - वाळीत टाकणे नकार देणे.

429.  बांधणी करणे - रचना करणे.

430.  बाजारगप्पा – निंदा नालस्ती.

431.  बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे.

432. बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे.

433. बारा वाजणे - पूर्ण नाश होणे.

434. बावरणे – गोंधळणे.

435. बाहू स्फुरण पावणे - स्फूर्ती येणे.

436. बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.

437.  बेत आखणे - योजना आखणे.

438.  बेत करणे - योजना आखणे.

439. बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ न देणे.

440. बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहणे.

441. बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

442. बोल लावणे - दोष देणे.

443. बोला फुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.

444. बोळ्याने दूध पिणे - बुद्धिहीन असणे.

445. ब्रभ्रा करणे - बोभाटा करणे,सगळीकडे प्रसिद्ध करणे.

446. भंडावून सोडणे - त्रास देणे.

447. भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.

448. भडभडून येणे - हुंदके देणे,गलबलणे.

449. भरभराट होणे - प्रगती होणे,समृद्धी होणे.

450. भरारी मारणे - झेप घेणे.

451. भाऊबंदकी असणे - नात्यानात्यात भांडण असणे.

452. भान ठेवणे - जाणीव ठेवणे.

453. भान नसणे - जाणीव नसणे.

454. भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे.

455. भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे.

456. भ्रमण करणे - भटकंती करणे.

457.  मती गुंग होणे - आश्चर्य वाटणे.

458. मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.

459. मधून विस्तव न जाणे - अतिशय वैर असणे.

460.  मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.

461.  मन सांशक होणे - मनात संशय वाटू लागणे.

462. मनात घर करणे - मनात कायमचे राहणे.

463. मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य करणे.

464. मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.

465.  मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबणे.

466. मनावर बिंबवणे - मनावर ठसवणे.

467. मनोरथ पूर्ण होणे - इच्छा पूर्ण होणे.

468. मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे.

469. मांडीवर घेणे – दत्तक घेणे.

470. मागमूस नसणे - थांगपत्ता नसणे.

471.मात करणे - विजय मिळवणे.

472. मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.

473.मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे.

474. मान्यता पावणे - सिद्ध होणे.

475. माशा मारणे - कोणताही उद्योग न करणे.

476. माशी शिंकणे - अडथळा येणे.

477.  मिनतवारी करणे – दादा-पुता करणे.

478. मिशांना तूप लावणे - उगीच ऐट दाखवणे.

479. मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.

480. मुखोद्गत असणे – तोंडपाठ असणे.

481. मूग गिळणे - उत्तर न देता गप्प राहणे.

482. मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे.

483. यक्षप्रश्न असणे - महत्त्वाची गोष्ट असणे.

484. योगक्षेम चालविणे - रक्षणाची काळजी वाहणे.

485. रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे.

486. रक्षणाची काळजी घेणे - योगक्षेम चालविणे.

487. रवाना होणे - निघून जाणे.

488. रस असणे - अत्यंत आवड असणे.

489. राईचा पर्वत करणे – क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.

490. राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

491. राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.

492. राबता असणे - सतत ये-जा असणे.

493. राम नसणे - अर्थ नसणे.

494.  राम म्हणणे - शेवट होणे,मृत्यू येणे.

495. रियाज करणे - सराव करणे.

496. रुची निर्माण होणे - गोडी निर्माण होणे.

497. रोष ठेवणे - नाराजी असणे,चीड येणे.

498.  लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.

499.  लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे,श्रीमंती असणे.

500. ललकारी देणे - जयघोष करणे.

501. लळा लागणे - ओढ वाटणे.

502. लवलेश नसणे - जराही पत्ता नसणे,जराही न उरणे.

503. लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

504. लष्टक लावणे - झंझट लावणे,निकड लावणे.

505. लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे.

506. लांछनास्पद असणे – लाजिरवाणे असणे.

507. लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे.

508. वंचित रहाणे - एखादी गोष्ट न मिळणे.

509. वकीलपत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे.

510. वजन पडणे – प्रभाव पडणे.

511.  वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणे.

512. वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुस-यावर काढणे.

513. वणवण करणे - खूप भटकणे.

514. वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.

515. वरदान देणे - कृपाशीर्वाद देणे.

516.  वाचा बंद होणे - तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे.

517.  वाचा बसणे - एक शब्दही बोलता न येणे.

518.  वाट तुडवणे - रस्ता कापणे.

519.  वाट लावणे - विल्हेवाट लावणे,मोडूनतोडून टाकणे.

520. वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे.

521.  वारसा देणे - वडिलोपार्जित हक्क सोपवणे.

522. विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.

523. विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

524. विदीर्ण होणे - भग्न होणे,मोडतोड होणे.

525. विपर्यास होणे – असंगत अर्थ लावणे.

526. विरस होणे - निराशा होणे,उत्साहभंग होणे.

527.  विरोध दर्शवणे - प्रतिकार करणे.

528.  विसंवाद असणे - एकमेकांशी न जमणे.

529. विसावा घेणे - विश्रांती घेणे.

530. विहरणे - संचार करणे.

531. वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.

532. वेसण घालणे - मर्यादा घालणे.

533. व्रत घेणे - वसा घेणे.

534.  शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ येणे.

535. शब्द जमिनीवर पडू न देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

536.  शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

537.  शिगेला पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.

538.  श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.

539.  संधान बांधने - जवळीक निर्माण करणे.

540.  संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे.

541.  संभ्रमित होणे – गोंधळणे.

542.  सख्य नसणे - प्रेमळ नाते नसणे,मैत्री नसणे.

543.  सपाटा लावणे - एकसारखे वेगात काम करणे.

544.  समजूत काढणे – समजावणे.

545.  समरस होणे - गुंग होणे.

546.  सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

547.  सहभागी होणे - सामील होणे.

548. सही ठोकणे - निश्चित करणे.

549. सहीसलामत सुटणे - दोष न येता सुटका होणे.

550. सांगड घालणे  - मेळ साधणे.

551. सांजावणे - संध्याकाळ होणे.

552. साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे.

553. साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे,खरेखुरे स्वरूप कळणे.

554. साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे.

555. साद घालणे - मनातल्या मनात दुःख करणे.

556. सामोरे जाणे - निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

557. सारसरंजाम असणे - सर्व साहित्य उपलब्ध असणे.

558. साशंक होणे - शंका येणे.

559. सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे.

560. सुळकांडी मारणे - सूर मारणे.

561. सूड घेणे - बदला घेणे.

562. सूतोवाच करणे - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे.

563. सोटेशाई चालवणे - दांडगाई करणे.

564. सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

565.  स्तंभित होणे - आश्चर्याने स्तब्ध होणे.

566. स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे.

567.  स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने,गर्वाने अतिशय फुगून जाणे.

568.  हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.

569.  हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे.

570.  हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे.

571.  हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

572.  हवालदिल होणे - हताश होणे.

573. हशा पिकणे - हास्य स्फोट होणे.

574.  हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.

575.  हसता हसता पोट दुखणे - खूप हसणे.

576. हस्तगत करणे - ताब्यात घेणे.

577.  हाडीमांसी भिनणे - अंगात मुरणे.

578.  हात ओला होणे - फायदा होणे.

579.  हात चोळणे – चरफडणे.

580.  हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.

581.  हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार घेणे.

582.  हात देणे - मदत करणे.

583.  हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

584. हात न पसरणे - न मागणे.

585. हात मारणे - ताव मारणे,भरपूर खाणे.

586. हात राखून जेवणे – कमी जेवणे.

587. हात हलवत परत येणे - काम न होता परत येणे.

588. हातघाईवर येणे – भांडणाची वेळ येणे.

589. हातचा मळ असणे – सहज शक्य असणे.

590. हातपाय गळणे - धीर सुटणे.

591. हातभार लावणे - सहकार्य करणे.

592. हाता पाया पडणे - गयावया करणे.

593. हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.

594. हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे.

595. हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

596. हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.

597. हाय खाणे - धास्ती घेणे.

598. हिसका दाखविणे - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.

599. हुडहुडी भरणे - थंडी भरणे.

600. हुल देणे - चकवणे.

601. हेवा वाटणे – मत्सर वाटणे.

602. हौस भागवणे - आवड पुरवून घेणे.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ  Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

Improve Your English Every Day | रोजच्या वापरातील 10 इंग्रजी शब्द, अर्थ व उदाहरणे

Daily Vocabulary Words ✓ learn-english-vocabulary-with-marathi-meaning   रोजच्या वापरातील 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द (1–10) आज आपण 10 महत्त्...

Popular Posts