Pages

Pages

Oct 1, 2025

ध्वनिदर्शक शब्द.


dhwani-darshak-shabd-marathi
dhwani-darshak-shabd-marathi

1)   सिंहाची – गर्जना

2)   वाघाची – डरकाळी, गुरगुरणे

3)   कुत्रा भुंकणे, केकाटणे, गुरगुर

4)   मांजर   म्याव-म्याव

5)   कोल्हा कोल्हेकुई

6)   हत्ती – चीत्कार,चित्कारणे

7)   घोडा खिंकाळणे

8)   गाय हंबरणे

9)   म्हैस रेकणे,

10)  बैल-रेडा  डुरकणे, डिरकणे

11)  माकडाचा – भुभु:कार

12)  गाढव ओरडणे, रेकणे

13)  डुक्कर – घुरघुर, गुरगुर

14)  तरस हसणे

15)  शेळी-मेंढी बें बें

16)  पाल  – चुकचुकणे

17)  माणूस – टाहो फोडणे, रडणेमाशी घोंघावणे

18)  मूल – आक्रोश, किंचाळी

19)  साप,नाग – फुत्कार, फुसफुसने, फिसकारणे

20)  बेडूक डराव-डराव, डरावणे, डरकणे

21)  कावळा – कावकाव

22)  कोंबडा बांग देणे, आरवणे, कुकूऽऽऽचकू

23)  कोंबडी क्लकक्लक

24)  चिमणी चिवचिवाट, चिव-चिव

25)  घुबड  – घुत्कारणे, घुमणे

26)  कबुतराचे/पारव्याचे – घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू

27)  बदक  क्व्यॅक-क्व्यॅक

28)  कोकिळ कुहूकुहू

29)  मोराचा – केकारव

30)  मोरांची – केकावली

31)  हंसाचा – कलरव  

32)  घार किलकिलणे,

33)  दयाळ  गाणे

34)  बुलबुल गाणे

35)  मैना गाणे

36)  पक्ष्यांचा – कलकलाट, किलबिलाट

37)  पंखांचा – फडफडाट

38)  उडणे – भुऽऽर्रकन

39)  भुंगा गूंऽऽऽगूं करणे, गुंजारव, गुंजन

40)  मधमाश्यांचा – गुंजारव

41)  रातकिडा – किरकिरणे

42)  डास गुणगुणणे,भुणभुण

43)  अश्रूंची – घळघळ

44)  जात्याची – घरघर

45)  पाण्याचा – खळखळाट

46)  विजांचा – कडकडाट

47)  ढगांचा – गडगडाट  

48)  नाण्यांचा – छनछनाट

49)  बांगड्यांचा – किणकिणाट

50)  ढोल – ढमढमाट

51)  तलवारीचा – खणखणाट

52)  घंटयांचा – घणघणाट

53)  तारकांचा – चमचमाट

54)  भांडी – खणखणाट

55)  टाळ्यांचा  – कडकडाट

56)  पानांची – सळसळ

57)  रक्ताची – भळभळ

58)  आगगाडी झुकझुक, धाड धाड

59)  पैंजनांची – छूमछूम

60)  पाऊस रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो

61)  वारा घोंघावणे, फोफावणे, सूं सूं

62)  मोटार – पों पों, पीप पीप

63)  दार कुरकुर, करकर

64)  दार ठोठावणे – ठकठक

65)  बूटांचा आवाज – ठकठक

66)  बंदूक – ठोंऽऽठों

67)  धबधबा धो धो

68)  वार करणे -सपकण

69)  निसटणे – सटकण

70)  चावणे – कचकण

71)  बटण दाबणे – खटकण

72)  वळणे – गरकण

73)  घड्याळ – टिक-टिक

74)  फुटणे – खळकण

75)  पाठीवर धपाटा/पडणे – धप्पकन

76)  बसने – मटकण

77)  आरसा फुटणे – खळकण

78)  फाटणे – टरकण

79)  गिळणे – गटकण

80)  शिट्टी – फुर्र

81)  गालावर थाप/चापट – फाडकन

82)  तोफ – धडाम

83)  फटाके – धडामधूम

84)  फोन/घंटी – ट्रिंग ट्रिंग

85)  झऱ्याची - खळखळ, झुळझुळ 

प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज (ध्वनिदर्शक शब्द) यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.            

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील. 

 

 हे ही वाचा स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण 

 👉म्हणी व त्यांचे अर्थ.

 

👉प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज 

 

👉विरूद्धार्थी शब्द मराठी  

 

👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 

 

👉वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग 

 

No comments:

Post a Comment