Sep 5, 2025

English Prepositions On, In, Into, At, For, Under सोप्या उदाहरणांसह,How to Use On, In, Into, At, For, Under in English – With Examples

English Prepositions (on, in, into, at, for, under) with Marathi Meaning & Examples
English-Prepositions-On-In-Into-At-For-Under
English-Prepositions-On-In-Into-At-For-Under




1) On (ऑन)

मराठी अर्थ: वर, पृष्ठभागावर

वापर:

·        एखाद्या वस्तूच्या वर असण्यास The book is on the table.

·        दिवस, तारीख, विशिष्ट वेळ on Monday, on 15th August.

·        उपकरणे/यंत्र चालू असणे The light is on.

·        विषय/प्रकरण a book on history.


20 उदाहरणे – On

1.      The book is on the table.
(द बुक इज ऑन द टेबल) – पुस्तक टेबलावर आहे.

2.      The pen is on the floor.
(द पेन इज ऑन द फ्लोर) – पेन जमिनीवर आहे.

3.      I will meet you on Monday.
(आय विल मीट यू ऑन मंडे) – मी तुला सोमवारी भेटेन.

4.      He was born on 15th August.
(ही वॉज बॉर्न ऑन फिफ्टीनथ ऑगस्ट) – तो १५ ऑगस्टला जन्मला.

5.      The light is on.
(द लाईट इज ऑन) – लाईट चालू आहे.

6.      Don’t sit on the ground.
(डोन्ट सिट ऑन द ग्राउंड) – जमिनीवर बसू नकोस.

7.      The picture is on the wall.
(द पिक्चर इज ऑन द वॉल) – चित्र भिंतीवर आहे.

8.      She is on the phone.
(शी इज ऑन द फोन) – ती फोनवर बोलत आहे.

9.      They are on the bus.
(दे आर ऑन द बस) – ते बसमध्ये आहेत.

    इथे on the bus म्हणजे बसच्या आत प्रवास करत आहेत असा अर्थ आहे.(इंग्रजीत बस, ट्रेन, विमान, जहाज यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीसाठी on चा वापर होतो, in नव्हे.)

10.   He is on the way.
(ही इज ऑन द वे) – तो येत आहे/रस्त्यावर आहे.

11.   We watched a movie on TV.
(वी वॉच्ड अ मूव्ही ऑन टीव्ही) – आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहिला.

12.   She wrote a book on history.
(शी रोट अ बुक ऑन हिस्टरी) – तिने इतिहासावर पुस्तक लिहिले.

13.   He is on duty.
(ही इज ऑन ड्युटी) – तो ड्युटीवर आहे.

14.   The cat is sleeping on the bed.
(द कॅट इज स्लीपिंग ऑन द बेड) – मांजर पलंगावर झोपली आहे.

15.   Don’t walk on the grass.
(डोन्ट वॉक ऑन द ग्रास) – गवतावर चालू नकोस.

16.   He put his hand on my shoulder.
(ही पुट हिज् हॅण्ड ऑन माय शोल्डर) – त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला.

17.   There is dust on the fan.
(देअर इज डस्ट ऑन द फॅन) – पंख्यावर धूळ आहे.

18.   She congratulated me on my success.
(शी कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस) – तिने माझ्या यशाबद्दल माझे अभिनंदन केले.

19.   Don’t spend too much time on mobile.
(डोन्ट स्पेंड टू मच टाइम ऑन मोबाइल) – मोबाइलवर जास्त वेळ घालवू नकोस.

20.   The vase is on the shelf.
(द वेस इज ऑन द शेल्फ) – फूलदाणी कपाटावर आहे.

2) In (इन)

मराठी अर्थ: मध्ये, आत

वापर:

·        एखाद्या जागेच्या आत असणे The ball is in the box.

·        वेळेसाठी in the morning, in 2020.

·        एखाद्या परिस्थितीत/भावनेत in trouble, in danger.

·        देश, शहर, गाव, इमारत in India, in the room.


20 उदाहरणे – In

1.      The ball is in the box.
(द बॉल इज इन द बॉक्स) – चेंडू बॉक्समध्ये आहे.

2.      She is in the room.
(शी इज इन द रूम) – ती खोलीत आहे.

3.      We live in India.
(वी लिव्ह इन इंडिया) – आम्ही भारतात राहतो.

4.      He is in the car.
(ही इज इन द कार) – तो कारमध्ये आहे.

5.      The money is in the bag.
(द मनी इज इन द बॅग) – पैसे पिशवीत आहेत.

6.      There is water in the bottle.
(देअर इज वॉटर इन द बॉटल) – बाटलीत पाणी आहे.

7.      He works in a bank.
(ही वर्क्स इन अ बँक) – तो बँकेत काम करतो.

8.      She is in the garden.
(शी इज इन द गार्डन) – ती बागेत आहे.

9.      The pen is in my pocket.
(द पेन इज इन माय पॉकेट) – पेन माझ्या खिशात आहे.

10.   They are in the park.
(दे आर इन द पार्क) – ते बागेत आहेत.

11.   He was born in 2000.
(ही वॉज बॉर्न इन टू थाऊजंड) – त्याचा जन्म २००० मध्ये झाला.

12.   We sleep in the night.
(वी स्लीप इन द नाईट) – आम्ही रात्री झोपतो.

13.   The baby is in the cradle.
(द बेबी इज इन द क्रेडल) – बाळ पाळण्यात आहे.

14.   There are apples in the basket.
(देअर आर अॅपल्स इन द बास्केट) – टोपलीत सफरचंद आहेत.

15.   He is in trouble.
(ही इज इन ट्रबल) – तो अडचणीत आहे.

16.   She is in danger.
(शी इज इन डेंजर) – ती धोक्यात आहे.

17.   He is in love with her.
(ही इज इन लव्ह विथ हर) – तो तिच्या प्रेमात आहे.

18.   There is a bird in the cage.
(देअर इज अ बर्ड इन द केज) – पिंजऱ्यात एक पक्षी आहे.

19.   She is in the kitchen.
(शी इज इन द किचन) – ती स्वयंपाकघरात आहे.

20.   The students are in the classroom.
(द स्टुडंट्स आर इन द क्लासरूम) – विद्यार्थी वर्गात आहेत.


3) Into (इंटू)

मराठी अर्थ: मध्ये, आत जाणे,

वापर:

·        एखाद्या वस्तूत/जागेत आत जाण्याची क्रिया दाखवण्यासाठी.

·        बदल/परिवर्तन दाखवण्यासाठी change into, turn into.


20 उदाहरणे – Into

1.      He went into the room.
(ही वेंट इंटू द रूम) – तो खोलीत गेला.

2.      She jumped into the pool.
(शी जंप्ड इंटू द पूल) – तीने तलावात उडी मारली.

3.      The cat ran into the house.
(द कॅट रॅन इंटू द हाऊस) – मांजर घरात पळाली.

4.      He put the money into the box.
(ही पुट द मनी इंटू द बॉक्स) – त्याने पैसे बॉक्समध्ये ठेवले.

5.      The bird flew into the sky.
(द बर्ड फ्ल्यू इंटू द स्काय) – पक्षी आकाशात उडून गेला.

6.      She walked into the kitchen.
(शी वॉक्ड इंटू द किचन) – ती स्वयंपाकघरात गेली.

7.      He drove into the city.
(ही ड्रोव्ह इंटू द सिटी) – तो शहरात गेला. (गाडी चालवत).

8.      The train went into the tunnel.
(द ट्रेन वेंट इंटू द टनल) – गाडी बोगद्यात गेली.

9.      She put her hand into the bag.
(शी पुट हर हॅण्ड इंटू द बॅग) – तिने हात बॅगेत घातला.

10.   The boy dived into the river.
(द बॉय डाइव्ड इंटू द रिव्हर) – मुलाने नदीत डुबकी मारली.

11.   The ball fell into the well.
(द बॉल फेल इंटू द वेल) – चेंडू विहिरीत पडला.

12.   He threw the stone into the water.
(ही थ्रू द स्टोन इंटू द वॉटर) – त्याने दगड पाण्यात फेकला.

13.   The thief broke into the house.
(द थीफ ब्रोक इंटू द हाऊस) – चोर घरात शिरला/घुसला.

14.   She poured milk into the glass.
(शी पोर्ड मिल्क इंटू द ग्लास) – तिने दूध ग्लासमध्ये ओतले.

15.   He changed into new clothes.
(ही चेंज्ड इंटू न्यू क्लोथ्स) – त्याने नवे कपडे घातले.

16.   The caterpillar turned into a butterfly.
(द कॅटरपिलर टर्न्ड इंटू अ बटरफ्लाय) – अळी फुलपाखरू झाली./सुरवंट फुलपाखरात बदलला.

17.   The road leads into the village.
(द रोड लीड्स इंटू द व्हिलेज) – रस्ता गावात जातो.

18.   She got into the car.
(शी गॉट इंटू द कार) – ती कारमध्ये बसली.

19.   He moved into a new house.
(ही मूव्ह्ड इंटू अ न्यू हाऊस) – तो नवीन घरात राहायला गेला.

20.   The students went into the hall.
(द स्टुडंट्स वेंट इंटू द हॉल) – विद्यार्थी हॉलमध्ये गेले.


4) At (अॅट)

मराठी अर्थ: येथे, जवळ

वापर:

·        ठिकाण/स्थान at the station, at school.

·        वेळ at 5 o’clock, at night.

·        उद्दिष्ट laugh at, look at.


20 उदाहरणे – At

1.      He is at the door.
(ही इज अॅट द डोअर) – तो दाराजवळ आहे.

2.      We are at the station.
(वी आर अॅट द स्टेशन) – आम्ही स्टेशनवर आहोत./ आम्ही स्थानकावर आहोत.

3.      She is at home.
(शी इज अॅट होम) – ती घरी आहे.

4.      The teacher is at the blackboard.
(द टीचर इज अॅट द ब्लॅकबोर्ड) – शिक्षक फळ्यासमोर उभे आहेत.

5.      We met at the park.
(वी मेट अॅट द पार्क) – आम्ही बागेत भेटलो.

6.      He was at school yesterday.
(ही वॉज अॅट स्कूल यस्टरडे) – तो काल शाळेत होता.

7.      She is good at dancing.
(शी इज गुड अॅट डान्सिंग) – ती नृत्यात चांगली आहे.

8.      Look at the sky.
(लुक अॅट द स्काय) – आकाशाकडे पाहा.

9.      Don’t laugh at him.
(डोन्ट लाफ अॅट हिम) – त्याच्यावर हसू नकोस.

10.   He is sitting at the table.
(ही इज सिटिंग अॅट द टेबल) – तो टेबलजवळ बसला आहे.

11.   The bus stops at Pune.
(द बस स्टॉप्स अॅट पुणे) – बस पुण्यात थांबते.

12.   The train arrives at 6 o’clock.
(द ट्रेन अराईव्ह्ज अॅट सिक्स ओक्लॉक) – गाडी सहा वाजता येते.

13.   She is standing at the gate.
(शी इज स्टॅण्डिंग अॅट द गेट) – ती गेटजवळ उभी आहे.

14.   He shouted at me.
(ही शाऊटेड अॅट मी) – तो माझ्यावर ओरडला.

15.   We reached at the bus stop.
(वी रीच्ड अॅट द बस स्टॉप) – आम्ही बसस्टॉपवर पोहोचलो.

16.   He smiled at her.
(ही स्माईल्ड अॅट हर) – तो तिच्याकडे पाहून हसला.

17.   They arrived at the airport.
(दे अराईव्ह्ड अॅट द एअरपोर्ट) – ते विमानतळावर पोहोचले.

18.   He knocked at the door.
(ही नॉक्ड अॅट द डोअर) – त्याने दार ठोठावले.

19.   We met at midnight.
(वी मेट अॅट मिडनाईट) – आम्ही मध्यरात्री भेटलो.

20.   He works at a hospital.
(ही वर्क्स अॅट अ हॉस्पिटल) – तो हॉस्पिटलमध्ये काम करतो.


5) For (फॉर)

मराठी अर्थ: साठी, कारणासाठी,करीता.

वापर:

·        उद्दिष्ट/कारण This gift is for you.

·        कालावधी for two hours, for a week.

·        समर्थन/विरोध for or against.


20 उदाहरणे – For

1.      This gift is for you.
(दिस गिफ्ट इज फॉर यू) – ही भेटवस्तू तुझ्यासाठी आहे.

2.      I bought flowers for my mother.
(आय बॉट फ्लावर्स फॉर माय मदर) – मी माझ्या आईसाठी फुले विकत घेतली.

3.      He works hard for success.
(ही वर्क्स हार्ड फॉर सक्सेस) – तो यशासाठी मेहनत करतो.

4.      I am waiting for you.
(आय अॅम वेटिंग फॉर यू) – मी तुझी वाट पाहतोय.

5.      This letter is for her.
(दिस लेटर इज फॉर हर) – हे पत्र तिच्यासाठी आहे.

6.      We are ready for the exam.
(वी आर रेडी फॉर द एक्झाम) – आम्ही परीक्षेसाठी तयार आहोत.

7.      She cooked food for me.
(शी कुक्ड फूड फॉर मी) – तिने माझ्यासाठी जेवण बनवले.

8.      He is looking for his book.
(ही इज लुकिंग फॉर हिज् बुक) – तो त्याचे पुस्तक शोधत आहे.

9.      This medicine is for fever.
(दिस मेडिसिन इज फॉर फीव्हर) – हे औषध तापासाठी आहे.

10.   We walked for two hours.
(वी वॉक्ड फॉर टू अवर्स) – आम्ही दोन तास चाललो.

11.   He lived here for ten years.
(ही लिव्ह्ड हिअर फॉर टेन इयर्स) – तो इथे दहा वर्षे राहिला.

12.   The train was late for an hour.
(द ट्रेन वॉज लेट फॉर अॅन अवर) – गाडी एक तास उशिरा आली.

13.   I am thankful for your help.
(आय अॅम थॅन्कफुल फॉर युवर हेल्प) – मी तुझ्या मदतीसाठी आभारी आहे.

14.   He is famous for his songs.
(ही इज फेमस फॉर हिस साँग्स) – तो त्याच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

15.   She left for Mumbai.
(शी लेफ्ट फॉर मुंबई) – ती मुंबईला गेली.

16.   This story is for children.
(दिस स्टोरी इज फॉर चिल्ड्रन) – ही गोष्ट मुलांसाठी आहे.

17.   He was punished for his mistake.
(ही वॉज पनिश्ड फॉर हिज् मिस्टेक) – त्याला त्याच्या चुकीसाठी शिक्षा झाली.

18.   She cried for help.
(शी क्राईड फॉर हेल्प) – ती मदतीसाठी ओरडली.

19.   We fight for freedom.
(वी फाईट फॉर फ्रीडम) – आम्ही स्वातंत्र्यासाठी लढतो.

20.   This pen is for writing.
(दिस पेन इज फॉर रायटिंग) – हा पेन लिहिण्यासाठी आहे.


6) Under (अंडर)

मराठी अर्थ: खाली.

वापर:

·        एखाद्या वस्तूच्या खाली असणे The cat is under the table.

·        स्थिती/प्रभावाखाली under pressure, under control.

·        कमी/खाली under 18, under water.


20 उदाहरणे – Under

1.      The cat is under the table.
(द कॅट इज अंडर द टेबल) – मांजर टेबलाखाली आहे.

2.      The shoes are under the bed.
(द शूज आर अंडर द बेड) – बूट पलंगाखाली आहेत.

3.      The pen is under the book.
(द पेन इज अंडर द बुक) – पेन पुस्तकाखाली आहे.

4.      The dog is under the chair.
(द डॉग इज अंडर द चेअर) – कुत्रा खुर्चीखाली आहे.

5.      Water flows under the bridge.
(वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज) – पूलाखालून पाणी वाहते.

6.      The child is under the tree.
(द चाईल्ड इज अंडर द ट्री) – मूल झाडाखाली आहे.

7.      She is under stress.
(शी इज अंडर स्ट्रेस) – ती तणावाखाली आहे.

8.      He is under pressure.
(ही इज अंडर प्रेशर) – तो दडपणाखाली आहे.

9.      The project is under process.
(द प्रोजेक्ट इज अंडर प्रोसेस) – प्रकल्प प्रक्रियेत आहे.

10.   He is under control.
(ही इज अंडर कंट्रोल) – तो नियंत्रणाखाली आहे.

11.   The fish live under water.
(द फिश लिव्ह अंडर वॉटर) – मासे पाण्याखाली/पाण्याच्या आत राहतात.

12.   The ball rolled under the sofa.
(द बॉल रोल्ड अंडर द सोफा) – चेंडू सोफ्याखाली गेला.

13.   The baby is under the blanket.
(द बेबी इज अंडर द ब्लँकेट) – बाळ चादरीखाली आहे./ बाळ ब्लँकेटखाली आहे.

14.   He is under treatment.
(ही इज अंडर ट्रीटमेंट) – त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

15.   The country is under attack.
(द कंट्री इज अंडर अटॅक) – देशावर हल्ला होत आहे.

16.   He is under 18.
(ही इज अंडर एटीन) – तो १८ वर्षाखालील आहे.

17.   The box is under the shelf.
(द बॉक्स इज अंडर द शेल्फ) – बॉक्स कपाटाखाली आहे.

18.   She is under my care.
(शी इज अंडर माय केअर) – ती माझ्या देखरेखीखाली आहे.

19.   He worked under his father.
(ही वर्क्ड अंडर हिज् फादर) – तो त्याच्या वडिलांच्या हाताखाली काम करत असे.

20.   The city is under construction.
(द सिटी इज अंडर कन्स्ट्रक्शन) – शहर बांधकामाखाली आहे./ शहराचे बांधकाम सुरू आहे.


 pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

Featured Post

English Prepositions On, In, Into, At, For, Under सोप्या उदाहरणांसह,How to Use On, In, Into, At, For, Under in English – With Examples

English Prepositions (on, in, into, at, for, under) with Marathi Meaning & Examples English-Prepositions-On-In-Into-At-For-Under 1...

Popular Posts