Welcome to Vocab Shiksha!
A fun and easy way for kids to build strong English vocabulary — with Hindi and Marathi meanings for better understanding. Explore daily word lists, example sentences, colorful images, and free PDF downloads for practice and revision. Perfect for school students, parents, and teachers looking for simple, trilingual vocabulary learning.
📘 Learn English the smart way – with your own languages!
📝 Download free worksheets and word PDFs.
Pages
▼
Pages
▼
Jun 14, 2025
विभाज्यतेच्या कसोट्या divisibility rules
vibhajyatechya-kasotya
२ ची कसोटी
* ज्या संख्येच्या एकक स्थानी २,४,६,८,० हे अंक येतात
त्या संख्येला २ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २ ने विभाज्य
असते.
उदा. ३२,६४,४६,७८,९० इ.
३ची कसोटी
* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या
संख्येलाही ३ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३ ने विभाज्य असते.
उदा. ५७३ = ५+७+३= १५
१५ ला ३ ने भाग जातो म्हणून ५७३ या संख्येलाही ३ने निःशेष भाग जातो.
४ची कसोटी
* दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना ४ ने पूर्ण
भाग जात असेल तर त्या संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ४ ने
विभाज्य असते.
उदा. ५८७४२४,३४८७१५२,७३२ इ.
यात ५८७४२४या संख्येतील
शेवटचे दोन अंक २४ आहेत.२४ या संख्येस ४ ने पूर्ण भाग जातो म्हणून५८७४२४ या
संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो.
५ची कसोटी
* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५हे अंक येतात
त्या संख्येला ५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ५ ने विभाज्य असते.
उदा. ५३० ,४९५, २१५,६७० इ.
६ची कसोटी
* ज्या संख्येला२ ने व ३ ने भाग
जातो त्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ६ ने विभाज्य असते.
उदा. १२,५४,१०८,२७३६ इ.
९चीकसोटी
* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ९ने भाग जातो त्या
संख्येलाही ९ने निःशेष भाग जातोकिंवा ती संख्या९ ने विभाज्य
असते.
उदा. ५३८४७ = ५+३+८+४+७= २७
यात २७ला ९ ने भाग जातो
म्हणून ५३८४७ या संख्येलाही ९ नेनिःशेष भाग जातो.
१०चीकसोटी
* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० हाअंक येतोत्या संख्येला १०
ने निःशेष
भाग जातो किंवा ती संख्या १० ने विभाज्य
असते.
उदा. ३० ,४५० , २७६०,९५४७०इ.
११ ची कसोटी
* दिलेल्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज करून
व विषम स्थानच्या अंकांची बेरीज करूनत्यांच्यातील फरक
काढला असता तो ० किंवा ११ च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला ११ने निःशेष भागजातो किंवा ती संख्या ११ ने विभाज्य
असते.
उदा. (१) ५२९५६२
५+९+६=२० आणि२+५+२ =९आता वजाबाकी करू
२०-९=११
म्हणून ५२९५६२ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
(२) ४५३२४.
४+३+४=११ आणि ५+२=७ आता वजाबाकी करू ११-७=४
म्हणून ४५३२४ हि संख्या ११ ने विभाज्य नाही.
(३) ८९४६३.
८+४+३=१५ आणि ९+६=१५ आता वजाबाकी करू १५-१५=०
म्हणून ८९४६३ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
१२चीकसोटी
* ज्या संख्येला३ ने व ४ ने भाग
जातो त्या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १२ ने विभाज्य असते.
उदा. ४८,१०८,३००इ.
१५चीकसोटी
* ज्या संख्येला३ ने व ५ ने भाग
जातो त्या संख्येला १५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १५ ने विभाज्य असते.
उदा. ४५,९०,१८०,१८६०इ.
१८ची कसोटी
* ज्या संख्येला २ ने व ९ ने भाग जातो त्यासंख्येला १८ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १८ ने
विभाज्य असते.
उदा. १२६,८१०,२७७२इ.
२० ची कसोटी
* ज्या
संख्येला ४ व ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २० ने
निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २० ने विभाज्य असते.
उदा.५४०,१७४०,१६९८० इत्यादी.
२१ ची कसोटी
* ज्या
संख्येला ७ व ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २१ ने
निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २१ ने विभाज्य असते.
उदा. ४८३,२०१६,१२३२७ इत्यादी
२२ ची
कसोटी
* ज्या
संख्येला २ व ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २२ ने
निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २२ ने विभाज्य असते.
उदा. ७९२,१८२६,१५०४८ इत्यादी
२४ ची
कसोटी
* ज्या
संख्येला ३ व ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २४ ने
निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २४ ने विभाज्य असते.
उदा. १२९६,२२५६,२०७१२ इत्यादी
३० ची
कसोटी
* ज्या
संख्येला ३ व १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस ३० ने
निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३० ने विभाज्य असते.
उदा. १२००,२८८०,२९६१० इत्यादी
Whats app चॅनल लिंकसाठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
No comments:
Post a Comment